बातम्या
अशोकअण्णांच्या वाढदिनानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन
By nisha patil - 12/11/2026 10:35:28 PM
Share This News:
अशोकअण्णांच्या वाढदिनानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन
मोफत महाआरोग्य शिबीर तपासणी व वैद्यकीय उपचार
*आजरा(हसन तकीलदार):-आजरा तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रात आपल्या कामातून ठसा उमटविणारे दीन दलितांच्या अडचणी समजून घेऊन त्यांचे निरसन करणारे असे जनमानसातील लोकप्रिय असलेले नेतृत्व, लोकनियुक्त नगराध्यक्ष नगरपंचायत आजरा तसेच आण्णा भाऊ संस्था समूहाचे प्रमुख,लोकनेते अशोकआण्णा चराटी यांच्या वाढदिनानिमित्य दि. 14 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 10:00 वाजता आण्णा भाऊ सांस्कृतिक हॉल, आजरा हायस्कुल,आजरा येथे माजी राज्यमंत्री भरमुआण्णा पाटील यांचे अध्यक्षतेखाली अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अशोकआण्णा चराटी वाढदिवस गौरव समितीतर्फे देण्यात आली आहे.
या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून नाम. प्रकाश आबिटकर, नाम. हसन मुश्रीफ उपस्थित राहणार आहेत तर राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, आम. शिवाजीराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती रहाणार आहे.
याप्रसंगी मोफत महाआरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या आरोग्यशिबिरात प्रामुख्याने दृष्टी, श्रवण तपासणी, चष्मे व श्रवणयंत्र वाटप, महिला आरोग्य तपासणी, सोनोग्राफी, मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग, इसीजी, रक्त तपासणी, टू डी इको एक्स रे इत्यादी सुविधा उपलब्ध असणार आहेत. तर शिबिरामध्ये असाध्य रोगांचे निदान झाल्यास पुढील उपचार शस्त्रक्रियेसह शासकीय योजनेतून मोफत केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
अशोकअण्णांच्या वाढदिनानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन
|