बातम्या

महापालिकेच्यावतीने शहरात सेंट्रल वॉर रुम सुरु

Central War Room launched in the city by the Municipal Corporation


By nisha patil - 5/26/2025 4:34:08 PM
Share This News:



महापालिकेच्यावतीने शहरात सेंट्रल वॉर रुम सुरु

कोल्हापूर ता.26 : पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढ होत असलेने महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील स्थायी समिती सभागृहात सेंट्रल वॉर रुम आजपासून सुरु करण्यात आला आहे.  महापालिकेने यापुर्वी अगिनशमन विभाग, चारही विभागीय कार्यालयामध्ये आपत्तीच्या काळात व्यवस्थापनेसाठी व पूर परिस्थितीच्या काळात नागरीकांच्या सोईसाठी मदत कक्ष सुरु केले आहे.

यामध्ये विभागीय कार्यालय क्रं.1 गांधी मैदान (0231-2622262), विभागीय कार्यालय क्रं.2 छ.शिवाजी मार्केट (0231-2543844), विभागीय कार्यालय क्रं.3 राजारामपूरी (0231-2521615), विभागीय कार्यालय क्रं.4 छ.ताराराणी मार्केट (0231-530011) या नंबरशी संपर्क साधावा. या मदत केंद्राबरोबर पंचगंगेची पाणी पातळी वाढत असल्याने नागरीकांच्या सोईसाठी मुख्य इमारतीमध्ये सेंट्रल वॉर रुम सुरु करण्यात आली आहे. या वॉर रूममध्ये 0231-2542601, 2545473 या दोन फोन नंबर्सवर नागरीकांनी आपल्या तक्रारी नोंदविता येणार आहेत. यामध्ये वादळ/पावसामुळे पडलेल्या झाडे उचलणे, स्थलांतरीत ठिकाणांची माहिती देणे, घराची पडझड झालेस त्याची माहिती देणे, स्थलांतरासाठी ठिकाणांची माहिती देणे व इतर पूराच्या अनुषंगीक मदतीसाठी हा वॉर रुम सुरु करण्यात आलेला आहे. तरी पूराच्या कालावधीमध्ये शहरातील नागरीकांनी या वॉर रुमशी संपर्क साधावा असे आवाहन प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी केले आहे.


महापालिकेच्यावतीने शहरात सेंट्रल वॉर रुम सुरु
Total Views: 62