बातम्या

जिल्ह्यातील सर्व्हायकल कॅन्सर प्रतिबंधक लसीकरण वर्षभरात पूर्ण करणार – मंत्री हसन मुश्रीफ

Cervical cancer prevention vaccination

By nisha patil - 8/25/2025 3:37:04 PM
Share This News:

जिल्ह्यातील सर्व्हायकल कॅन्सर प्रतिबंधक लसीकरण वर्षभरात पूर्ण करणार – मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर, दि.२४ : गर्भाशय मुखाच्या कॅन्सर प्रतिबंधासाठी एचपीव्ही लस मोफत देण्याची मोहीम राबवून जिल्ह्यातील ९ ते २६ वयोगटातील सर्व मुली व अविवाहित तरुणींना वर्षभरात लसीकरण पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

महावीर कॉलेजमध्ये आयोजित सर्व्हायकल कॅन्सर प्रतिबंधक लसीकरण शिबिराच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. महिलांनी लाज न बाळगता आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

याचबरोबर पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप मोहीम राबवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शेंडा पार्क येथे मस्क्युलर डिस्ट्रॉफी रुग्णांसाठी निवासी फिजिओथेरपी केंद्र लवकरच उभारले जाणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

जिल्ह्यातील सर्व्हायकल कॅन्सर प्रतिबंधक लसीकरण वर्षभरात पूर्ण करणार – मंत्री हसन मुश्रीफ
Total Views: 64