शैक्षणिक

दहावी स्टेट बोर्ड व सीबीएसई परीक्षेत चाटे क्लासेस व स्कूलचे घवघवीत यश !

Chaate Classes and Schools achieve tremendous success


By nisha patil - 5/13/2025 8:18:36 PM
Share This News:



दहावी स्टेट बोर्ड व सीबीएसई परीक्षेत चाटे क्लासेस व स्कूलचे घवघवीत यश !
 

समुहाच्या १८५७ विद्यार्थ्यांना ९०³ पेक्षा जास्त गुण ! 


 दहावी-२०२५ च्या विद्यार्थ्यांचा निकाल नुकताच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी वेबसाईटवर जाहीर केला. या जाहीर केलेल्या निकालानुसार चाटे शिक्षण समुहाच्या कोल्हापूर विभागातील कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व सोलापूर या जिल्ह्यातील चाटे क्लासेस व स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. 
 

या निकालासंदर्भात सविस्तर माहिती देताना चाटे शिक्षण समुहाचे संचालक प्रा. डॉ. भारत खराटे म्हणाले की, चाटे समुहाच्या १८५७  विद्यार्थ्यांनी या परीक्षेत ९० टक्के पेक्षा जास्त गुण, ८५ ते ९० टक्के  दरम्यान२०२५ विद्यार्थी आणि ८० ते ८५ टक्के दरम्यान ३०२६ विद्यार्थ्यांना गुण मिळाले आहेत. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाचे श्रेय नियोजनबद्ध परिश्रम, पालकांचे सहकार्य आणि मार्गदर्शक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे आहे. 
 

स्टेट बोर्ड परीक्षेत ९८ टक्के व त्यापेक्षा जास्त गुण मिळविणारे विद्यार्थी : पोवार नीरव, मिलके तनुजा, जाधव वेदश्री, पाटील अमृत, थोरात सिद्धी, रेंदाळे गौरव, केंद्रे वेदीका, पाटील सिद्धी, थिठे समर्थ, हुपरे उत्कर्ष, मुंढे श्रेय, माने गौरी, पाटील सृष्टी, बापट अनन्या, शेळके प्रगती, अंगज अक्षता, मोहीते ऋचा, साठे कुणाल, कपाले शिवेंद्र.सीबीएसई बोर्ड परीक्षेत ९० टक्के व त्यापेक्षा जास्त गुण मिळविणारे विद्यार्थी - पाटील यशोधरा, सुतार प्रांजल, पाटील सिद्धी, अदुरे स्नेहा, बाळुगडे संचिता, पाटील शौर्य, सांभरे शिवस्तुती, बोंद्रे आरूष, घोटवडेकर सक्षम, कांबळे सोहम, कोराणे सलोनी, रोटे अवधूत, माने मकरंद, डावरे पायल, मसुटे हितेश, पटेल देवांशी, शिंदे प्रांजली.विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल प्रा. मच्छिंद्र चाटे, प्रा. गोपीचंद चाटे व प्रा. डॉ. भारत खराटे, चाटे कोचिंग क्लासेस आणि चाटे स्कूलचे पदाधिकारी, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील उज्ज्वल भवितव्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या़ 


दहावी स्टेट बोर्ड व सीबीएसई परीक्षेत चाटे क्लासेस व स्कूलचे घवघवीत यश !
Total Views: 169