बातम्या
चैताली चव्हाण कार्यक्षम गुरुकुल प्रमुख पुरस्काराने सन्मानित
By nisha patil - 5/10/2026 11:17:06 PM
Share This News:
चैताली चव्हाण कार्यक्षम गुरुकुल प्रमुख पुरस्काराने सन्मानित
शिरढोण प्रतिनिधी( संजय गायकवाड )/ता.५ रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या वतीने विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना दक्षिण विभागातून माननीय बी बी पाटील यांच्या नावे दिला जाणारा "कार्यक्षम गुरुकुल प्रमुख" हा पुरस्कार रयत शिक्षण संस्थेच्या रमजानशेठ बाणदार विद्यालय शिरढोण ( ता.शिरोळ) येथील उपशिक्षिका श्रीमती. चैताली कुबेर चव्हाण यांना देण्यात आला.
सदरचा पुरस्कार रयत शिक्षण संस्थेच्या वर्धापनदिनी संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी व्हा.चेअरमन ॲड.भगीरथ शिंदे, एम.बी.शेख, संघटक डॉ. अनिल पाटील, खासदार सुप्रिया सुळे,सचिव किशोर राजेनिंबाळकर, लोकमतचे संपादक संजय आवटे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. सदरचा पुरस्कार स्वीकारत असताना मुख्याध्यापक सुनील खरात, स्कूल कमिटी सदस्य अविनाश पाटील, रणजीत पुजारी,राजेंद्र खोत, अशोक मगदूम, बाबासो मालगावे, डॉ. कुमार पाटील, अमीन शेख, आण्णासो जाधव, संजय गायकवाड, संतोष सैसाले, विकास चौगुले माणिक भोसले आदी उपस्थित होते.
चैताली चव्हाण कार्यक्षम गुरुकुल प्रमुख पुरस्काराने सन्मानित
|