बातम्या
चंदगड तहसील कार्यालयासमोर ३० ऑगस्ट रोजी बहुजन मुक्ती पार्टीचे धरणे आंदोलन
By nisha patil - 8/21/2025 9:16:27 PM
Share This News:
चंदगड तहसील कार्यालयासमोर ३० ऑगस्ट रोजी बहुजन मुक्ती पार्टीचे धरणे आंदोलन
चंदगड (प्रतिनिधी) हसन तकीलदार: जात प्रमाणपत्र मिळवताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याची मागणी करत बहुजन मुक्ती पार्टीने ३० ऑगस्ट २०२५ रोजी चंदगड तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे.

५ ऑगस्ट रोजी तहसीलदारांना लेखी निवेदन दिले असून त्यावर ठोस निर्णय न झाल्याने हा आंदोलनाचा टप्पा राबवला जाणार आहे. निवेदनात शासनाच्या नियमांतील विसंगती, १८ वर्षांपूर्वी प्रमाणपत्र न देण्याची अट, १९५० पूर्वीचे उतारे मागण्याचा अट्टाहास, तसेच २००५ च्या महापुरात कुरुंदवाड येथे नष्ट झालेली कागदपत्रे यासारख्या मुद्द्यांवर तीव्र आक्षेप नोंदविण्यात आला आहे.
बहुजन मुक्ती पार्टीचे नेते मनोहर चौगुले, ऍड. निलेश गायकवाड, विनायक खांडेकर, डॉ. उल्हास त्रिरत्ने, प्रकाश नाग आदींच्या उपस्थितीत निवेदन तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
👉 “जोपर्यंत योग्य निर्णय होत नाही, तोपर्यंत आंदोलनाची तीव्रता टप्प्याटप्प्याने वाढवली जाईल,” असा इशारा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र प्रभारी डॉ. उल्हास त्रिरत्ने यांनी दिला.
चंदगड तहसील कार्यालयासमोर ३० ऑगस्ट रोजी बहुजन मुक्ती पार्टीचे धरणे आंदोलन
|