ताज्या बातम्या
हलकर्णी–चंदगड मार्गावरील धोकादायक वळण काढा – ग्रामस्थांची मागणी
By nisha patil - 6/12/2025 1:35:53 PM
Share This News:
आजरा-: आजरा तालुक्यात हलकर्णी–चंदगड मार्गाचे रुंदीकरण व मजबुतीकरणाचे काम राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत सुरू आहे. मात्र या कामात धोकादायक एस-आकाराचे वळण (रेडेकर पोल्ट्री फार्मजवळ) काढले जात नसल्याने नागरिक नाराज आहेत. मलिग्रे, कानोली, हत्तीवडे, होनेवाडी ग्रामपंचायतींनी वळण तातडीने काढण्याची मागणी केली आहे.
सिमेंट काँक्रीट रस्त्यावर पाणी न मारण्याबाबतही तक्रार करण्यात आली असून हे सर्व निवेदन सहाय्यक अभियंता पी.बी. सुर्वे यांना देण्यात आले. वरिष्ठांना कळवून आवश्यक दुरुस्तीपर्यंत काम थांबविण्याची मागणी करण्यात आली आहे. वळण न काढल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला.
उपस्थित: अशोक शिंदे, सुभाष पाटील, संजय कांबळे, प्रकाश सावंत, कॉ. संजय घाटगे, धनराज बुगडे, शिवाजी निऊंगरे आदी.
हलकर्णी–चंदगड मार्गावरील धोकादायक वळण काढा – ग्रामस्थांची मागणी
|