बातम्या

चंदगड येथे काँग्रेसचा बालेकिल्ला भक्कम करण्याचा पदाधिकाऱ्यांचा संकल्प..

Chandgad1

By nisha patil - 10/24/2025 5:30:55 PM
Share This News:

चंदगड येथे काँग्रेसचा बालेकिल्ला भक्कम करण्याचा पदाधिकाऱ्यांचा संकल्प..

 काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या चंदगड तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक उत्साहात पार पडली. 

संघटनात्मक बळ अधिक मजबूत करून येणाऱ्या निवडणुका एकजुटीने आणि मोठ्या ताकदीने लढविण्याचा निर्धार यावेळी सर्वांनी व्यक्त केला. 

यावेळी जेष्ठ नेते गोपाळराव पाटील, गोकुळच्या संचालिका अंजनाताई रेडेकर, यांच्यासह संभाजीराव देसाई, जे. बी. पाटील, विलास पाटील, संतोष मळवीकर, राजेंद्र परीट, अभिजीत गुरबे, शिवाजी पाटील, अशोकराव जाधव, नारायण हसबे, शिवाजी तुपट, विलास पाटील, दिलीप चंदगडकर यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

चंदगड येथे काँग्रेसचा बालेकिल्ला भक्कम करण्याचा पदाधिकाऱ्यांचा संकल्प..
Total Views: 50