बातम्या
"चंद्रकांत चषक -२०२६" फुटबॉल स्पर्धा
By Administrator - 4/4/2026 3:27:43 PM
Share This News:
"चंद्रकांत चषक -२०२६" फुटबॉल स्पर्धा
आज संयुक्त जुना बुधवार पेठ तालीम मंडळ व खंडोबा तालीम यांनी प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळवत, पुढील फेरीत प्रवेश केला. बालगोपाल तालीम मंडळ आयोजित व जाधव इंडस्ट्रीज पुरस्कृत "चंद्रकांत चषक -२०२६" फुटबॉल स्पर्धेतील दुसऱ्या दिवसातील सामन्याची सुरुवात चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्ष राजू पाटील, संचालक संपत पाटील, अनिल धडाम, राहुल नष्टे, मंदार धर्माधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाली.
आजच्या पहिल्या सामन्यामध्ये संयुक्त जुना बुधवार पेठ तालीम मंडळाने संध्यामठ संघावर ४-० असा विजय मिळवला. या सामन्यात शुभम जाधव हा सामनावीरचा मानकरी ठरला. तर दुसऱ्या सामन्यात खंडोबा तालीम मंडळाने सुभाषनगर संघावरती ६-० असा विजय मिळवला. या सामन्यात शायर एस सामनावीरचा मानकरी ठरला. चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांच्या हस्ते सामनावीर खेळाडूंना बक्षीस देण्यात आले.

"चंद्रकांत चषक -२०२६" फुटबॉल स्पर्धा
|