बातम्या

कोल्हापुरात ‘चंद्रकांत चषक 2026’ची धूम! २.३१ लाखांचं भव्य बक्षीस

Chandrakant Cup 2026 a hit in Kolhapur


By Administrator - 3/17/2026 2:27:25 PM
Share This News:



कोल्हापुरात ‘चंद्रकांत चषक 2026’ची धूम! २.३१ लाखांचं भव्य बक्षीस

कोल्हापूरच्या क्रीडांगणात पुन्हा एकदा फुटबॉलचा थरार रंगणार असून बालगोपाल तालीम मंडळ आयोजित आणि जाधव इंडस्ट्रीज पुरस्कृत “चंद्रकांत चषक 2026” स्पर्धेला १८ मार्चपासून शाहू स्टेडियम येथे सुरुवात होत आहे.
 

या स्पर्धेत विजेत्या संघाला तब्बल २.३१ लाख रुपये, तर उपविजेत्याला १.३१ लाख रुपये आणि चषक देण्यात येणार आहे. उपांत्य फेरीतील संघांनाही रोख बक्षिसे देण्यात येणार असून, उत्कृष्ट खेळाडूंनाही विशेष पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.
 

स्पर्धेचं उद्घाटन बुधवारी दुपारी ३:३० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असून, १८ ते २९ मार्चदरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे. शहरात ठिकठिकाणी खेळाडूंचे बॅनर्स आणि दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांना अभिवादन करणारे पोस्टर्स लावण्यात येणार आहेत.


कोल्हापुरात ‘चंद्रकांत चषक 2026’ची धूम! २.३१ लाखांचं भव्य बक्षीस
Total Views: 19