राजकीय
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी चंद्रकांतदादा यांचे आवाहन...
By nisha patil - 4/10/2025 4:50:22 PM
Share This News:
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी चंद्रकांतदादा यांचे आवाहन...
राज्यात पुढील काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.
भाजपने आता निवडणुकीसाठी तयारीला जोरदार सुरुवात केली आहे. कोल्हापुरात बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले – लोकसभा, विधानसभेपेक्षा खरी निवडणूक ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि महापालिकेत होते.
जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे, तर महानगरपालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता दिवाळीनंतर जाहीर होईल. पाटील यांनी स्पष्ट केले की निवडणूक ही फास्ट ट्रेनसारखी आहे – प्लॅटफॉर्मवर जो राहील तो राहील, पण नाराज होऊ नका.
महायुतीत लढवायचे, पण अंतिम निर्णय वरिष्ठ नेत्यांकडे असेल; कार्यकर्त्यांचा बळी दिला जाणार नाही.
लोकांशी संपर्क वाढवा, 2017 ची परिस्थिती लक्षात घेऊन तयारी करा आणि दिवाळीचा फायदा घ्या, असेही त्यांनी मार्गदर्शन केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी चंद्रकांतदादा यांचे आवाहन...
|