राजकीय

नाम.चंद्रकांतदादा पाटील यांचा वाराणसीत विज्योत्सव

Chandrakantdada Patil victory celebration in Varanasi


By nisha patil - 4/5/2026 3:04:49 PM
Share This News:



नाम.चंद्रकांतदादा पाटील यांचा वाराणसीत विज्योत्सव

 

वाराणसी : पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुच्चेरी विधानसभा निवडणुकांतील यशानंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वाराणसी येथे विजयोत्सव साजरा केला. या उत्सवात भाजप नेते चंद्रकांतदादा पाटील यांनी सहभाग घेत कार्यकर्त्यांसोबत विजयाचा आनंद साजरा केला. या वेळी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. जल्लोष, घोषणाबाजी आणि आनंदोत्सवाच्या वातावरणात विजयाचा जयघोष करण्यात आला.


यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी “भारतीय जनता पार्टी हे एक कुटुंब असून कार्यकर्ते हेच त्याचे बळ आहेत,” असे सांगितले. विविध राज्यांतील विजयाचा आनंद सर्वांनी एकत्र येऊन साजरा केल्याने पक्षातील एकजूट अधोरेखित झाल्याचेही त्यांनी नमूद केले.


नाम.चंद्रकांतदादा पाटील यांचा वाराणसीत विज्योत्सव
Total Views: 3