बातम्या

सत्तांतर करा; मुरगूडचा कायापालट करु तालुक्यात दुसऱ्या क्रमांकाचे शहर, मात्र अपेक्षित विकास नाही- हसन मुश्रीफ

Change the government


By nisha patil - 11/28/2025 3:19:01 PM
Share This News:



सत्तांतर करा; मुरगूडचा कायापालट करु तालुक्यात दुसऱ्या क्रमांकाचे शहर, मात्र अपेक्षित विकास नाही-  हसन मुश्रीफ

मुरगूड /प्रतिनिधी मुरगूड हे तालुक्यातील दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे शहर असूनही गेल्या अनेक वर्षांत अपेक्षित विकासापासून दूर राहिले. त्यामुळे सत्तांतर करा, मुरगूडचा कायापालट करू, असे ठाम प्रतिपादन वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
     
मुरगूड नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. साई मंदिर रोड, आंबेडकर नगर, जमादार चौक परिसरात मंत्री हसन मुश्रीफ आणि राजे समरजितसिंह घाटगे यांच्या प्रचारसभा पार पडल्या.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, आधुनिक सुविधा, पायाभूत सोयी, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता व शहर सौंदर्यीकरण आदी सर्वच क्षेत्रांत मुरगूडला वेगाने पुढे नेण्याचा संकल्प आम्ही  केला आहे.

शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले,  निवडणुकीला सामोरे जाताना आपण समाजासाठी केलेल्या कामांची आणि पुढील काळातील विकास योजनांची माहिती जनतेसमोर मांडणे आवश्यक आहे. तळागाळातील नागरिकांसाठी सातत्याने काम करणाऱ्या आमच्या उमेदवारांना या निवडणुकीत विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. श्री. घाटगे पुढे म्हणाले,मुरगूडच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम नेतृत्वाची गरज असल्याचे नमूद करत शहराच्या पायाभूत सुविधा, सार्वजनिक सेवा आणि सर्वसामान्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी राष्ट्रवादी -शाहू आघाडीचे उमेदवार कटिबद्ध असल्याचा विश्वास घाटगे यांनी व्यक्त केला. 
   
या कार्यक्रमात गोकुळचे माजी चेअरमन रणजितसिंह पाटील, माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार, प्रा. चंद्रकांत जाधव, गौरव मोर्चे, रणजित सुर्यवंशी यांची भाषणे झाली.
  यावेळी दतामामा खराडे, अनंत फर्नांडीस, रणजित सुर्यवंशी, बजरंग सोनुले आदी प्रमुखासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. स्वागत अशोक चौगुले यांनी केले.


सत्तांतर करा; मुरगूडचा कायापालट करु तालुक्यात दुसऱ्या क्रमांकाचे शहर, मात्र अपेक्षित विकास नाही- हसन मुश्रीफ
Total Views: 13