शैक्षणिक

चाटे शिक्षण समूहाचे MHT-CET मध्ये घवघवीत यश...

Chate Education Groups impressive success in MHT CET


By nisha patil - 6/17/2025 1:58:27 PM
Share This News:



चाटे शिक्षण समूहाचे MHT-CET मध्ये घवघवीत यश...

272 विद्यार्थ्यांनी मिळवले 90 पर्सेंटाइल पेक्षा अधिक गुण

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (MHT-CET 2025 - PCM गट) मध्ये चाटे शिक्षण समूहाने यंदाही आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली आहे. या परीक्षेत २७२ विद्यार्थ्यांनी ९० पेक्षा अधिक पर्सेंटाइल मिळवून संस्था आणि पालकांचे नाव उज्वल केले आहे.

या यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे संचालक प्रा. मच्छिंद्र चाटे, प्रा. गोपीचंद चाटे, तसेच कोल्हापूर विभागीय संचालक प्रा. डॉ. भारत खराटे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

विशेषतः ७ विद्यार्थ्यांनी ९९ पर्सेंटाइलपेक्षा अधिक गुण मिळवून सर्वोत्तम इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेशासाठी आपली पात्रता सिद्ध केली आहे.

९९ पेक्षा अधिक पर्सेंटाइल मिळवणारे विद्यार्थी:

विजय प्रजापती (९९.८६)

ओम फराकटे (९९.७४)

भृती दिसले (९९.५७)

आयुष पोवार (९९.३४)

हर्षवर्धन शिंदे (९९.२०)

मिहीका कुंभोजकर (९९.१५)

अजय अनगोळकर (९९.००)

तसेच ९७ ते ९८.९९ पर्सेंटाइल मिळवणारे सुमारे ३० हून अधिक विद्यार्थी असून, त्यामध्ये करण कदम, आर्य खापणे, श्रेयस फराकटे, क्रिशीव पाटील, नदीम शेख, शिवम पाटील, ईश्वरी घाटगे, तनिष्का शिंदे, यशराज गाढवे यांचा समावेश आहे.


चाटे शिक्षण समूहाचे MHT-CET मध्ये घवघवीत यश...
Total Views: 66