बातम्या

चाटे शिक्षण समुहाकडून ‘अभ्यास सुरू करताना’ विशेष मार्गदर्शन व सत्कार समारंभ संपन्न !

Chate1


By nisha patil - 7/22/2025 1:49:31 PM
Share This News:



चाटे शिक्षण समुहाकडून ‘अभ्यास सुरू करताना’  विशेष मार्गदर्शन व सत्कार समारंभ संपन्न !

कोल्हापूर : चाटे शिक्षण समूह व श्री भास्कराचार्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच इयत्ता आठवी, नववी व दहावीचे विद्यार्थी व पालकांसाठी ‘अभ्यास सुरू करताना’ हा विशेष शैक्षणिक मार्गदर्शनपर कार्यक्रम व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ घेण्यात आला. या कार्यक्रमामध्ये एमटीएसई, एनटीएसई, स्कॉलरशिप यासह विविध क्रिडा प्रकारात नैपुण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

 

याप्रसंगी बोलताना, प्रा. डॉ. भारत खराटे, संचालक, चाटे शिक्षण समूह म्हणाले की, इयत्ता आठवी, नववी व दहावीतील विद्यार्थ्यांना भविष्यातील स्पर्धा परीक्षांची माहिती देवून फाऊंडेशन कोचिंगची सुरूवात चाटे शिक्षण समुहाने नुकतीच केली आहे. या परीक्षेतील यशामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून भविष्यातील स्पर्धा परीक्षेतील यशाची मुहूर्तमेढ रोवली जाते व त्यातून राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थी यश मिळवितात.विशेष पारितोषिक प्राप्त विद्यार्थी : धनवडे चिन्मय, निकम तन्वी, पाटील भाग्यश्री, अबंदे प्रगती, मनियार सुहानी, रेळेकर सोहम, धनगर प्रणव, बामणे अथर्व, धनगर अनंत, कांबळे भार्गव, सोले हर्षदा, संचानिया अदिती, डवंग सई, पसारे अनुष्का, वाळकी निधी, येसणे समिक्षा.

 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. एल. डी. थोरात यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष शिक्षक समिती तथा राष्ट्रीय कार्यकारिणी सरचिटणीस मा. प्रा. उन्मेश देसाई, प्रा. चंद्रकांत पाटील, चाटे समुहाचे पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. सौ. अनुराधा पडवळ यांनी मानले.


चाटे शिक्षण समुहाकडून ‘अभ्यास सुरू करताना’ विशेष मार्गदर्शन व सत्कार समारंभ संपन्न !
Total Views: 73