बातम्या

इचलकरंजीतून वाहणाऱ्या ओढ्यात रासायनिक सांडपाणी; पंचगंगेला धोका, उग्र आंदोलनाचा इशारा

Chemical sewage in the stream flowing through Ichalkaranji


By Administrator - 2/3/2026 4:37:59 PM
Share This News:



इचलकरंजीतून वाहणाऱ्या ओढ्यात रासायनिक सांडपाणी; पंचगंगेला धोका, उग्र आंदोलनाचा इशारा

महासत्ता चौक–आमराई मार्गावरील ओढ्यात काळेकुट्ट पाणी व प्रचंड प्लास्टिक कचरा; पाणी पंचगंगा नदी मार्गे कृष्णा नदीत मिसळत असल्याचा आरोप

प्रतिनिधी स्वप्नील गोरंबेकर इचलकरंजी : इचलकरंजी महानगरपालिका हद्दीतील महासत्ता चौक ते आमराईकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या ओढ्यात मोठ्या प्रमाणावर रासायनिक व सांडपाणी सोडले जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. स्थानिकांनी केलेल्या पाहणीत एका बाजूला प्रोसेसिंग युनिट, फाउंड्री, कत्तलखाने व गटारीचे काळेकुट्ट पाणी वाहताना दिसत आहे, तर दुसऱ्या बाजूला प्लास्टिक व इतर कचऱ्याचे ढीग इतक्या प्रमाणात साचले आहेत की त्यावर झाडे उगवली आहेत. यावरून हा कचरा अनेक दिवसांपासून साचलेला असल्याचे स्पष्ट होते.

सदर ओढ्यातील हे दूषित पाणी पुढे पंचगंगा नदीत मिसळते आणि त्यानंतर संपूर्ण शिरोळ तालुक्यातून कृष्णा नदीत जाते. या पाण्याचा वापर नागरिक व जनावरे करत असून शेतीसाठीही तेच पाणी वापरले जात असल्याने आरोग्य व पिकांवर गंभीर परिणाम होत असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

या प्रकरणी तात्काळ उपाययोजना न केल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा अखिल भारतीय जनहित पार्टीचे अध्यक्ष  कृष्णात दादासो पाटील यांनी दिला. यावेळी पर्यावरण समितीचे सदस्य विश्वासराव बालीघाटे (शिरढोण),  दत्तात्रेय पाटील (शिरढोण) व  रवी पाटील (इचलकरंजी) उपस्थित होते.

महानगरपालिकेने या गंभीर पर्यावरणीय प्रश्नावर तातडीने कारवाई करून ओढ्याची स्वच्छता, सांडपाणी प्रक्रिया आणि कचरा व्यवस्थापनाबाबत ठोस पावले उचलावीत, अशी नागरिकांची मागणी आहे.


इचलकरंजीतून वाहणाऱ्या ओढ्यात रासायनिक सांडपाणी; पंचगंगेला धोका, उग्र आंदोलनाचा इशारा
Total Views: 17