बातम्या

छत्रपती चषक टर्फ फुटबॉल स्पर्धेचे १४ फेब्रुवारीला उद्घाटन

Chhatrapati Cup Turf Football Tournament


By Administrator - 10/2/2026 3:19:37 PM
Share This News:



छत्रपती चषक टर्फ फुटबॉल स्पर्धेचे १४ फेब्रुवारीला उद्घाटन
 

कोल्हापूर : सालाबादप्रमाणे यंदाही छत्रपती चषक टर्फ फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन शनिवार, दि. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता टिकी टाका टर्फ, शाहू दयानंद हायस्कूल समोर, कोल्हापूर येथे होणार आहे.
 

या स्पर्धेमध्ये विविध भागातील नामांकित संघ सहभागी होणार असून क्रीडाप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. फुटबॉल खेळाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन कार्यक्रमास क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


छत्रपती चषक टर्फ फुटबॉल स्पर्धेचे १४ फेब्रुवारीला उद्घाटन
Total Views: 58