बातम्या

छत्रपती शाहू महाराज जयंती राजर्षी छत्रपती शाहू जीवन विकास ट्रस्टतर्फे उत्साहात साजरी

Chhatrapati Shahu Maharaj Jayanti celebrated with enthusiasm

By nisha patil - 6/26/2025 11:14:15 PM
Share This News:

छत्रपती शाहू महाराज जयंती राजर्षी छत्रपती शाहू जीवन विकास ट्रस्टतर्फे उत्साहात साजरी

कोल्हापूर | गंगावेश  राजर्षी छत्रपती शाहू जीवन विकास चॅरिटेबल ट्रस्ट, गंगावेश यांच्या वतीने सालाबादप्रमाणे छत्रपती शाहू महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

ट्रस्टच्या हॉलमध्ये सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. ऋतुराज क्षीरसागर यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला.

या वेळी ट्रस्टचे अध्यक्ष मा. श्री. किरण मांगुरे यांनी ट्रस्टची उद्दिष्टे, सामाजिक उपक्रम व जनहितासाठी चालवलेली कामे उपस्थितांना सांगितली.

कार्यक्रमास ट्रस्टचे सर्व संचालक, हितचिंतक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

छत्रपती शाहू महाराज जयंती राजर्षी छत्रपती शाहू जीवन विकास ट्रस्टतर्फे उत्साहात साजरी
Total Views: 70