बातम्या
गोकुळ दूध संघ निवडणुकीसाठी महायुतीच्या ‘छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी’ची घोषणा
By nisha patil - 8/10/2026 11:36:01 PM
Share This News:
गोकुळ दूध संघ निवडणुकीसाठी महायुतीच्या ‘छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी’ची घोषणा
कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी महायुतीच्या ‘छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी’ची घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. यावेळी महायुतीतील प्रमुख नेते, पदाधिकारी आणि उमेदवार उपस्थित होते.
या वेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार संजयबाबा घाटगे, माजी आमदार के. पी. पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तानाजी पाटील, जयसिंगपूरचे नगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, बाळासाहेब खाडे, भोगावती साखर कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर, आप्पासाहेब नलवडे, गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रकाशभाई पताडे, बाजार समितीचे अध्यक्ष प्रा. शेखर देसाई आदी उपस्थित होते.
आघाडीच्या उमेदवारांमध्ये माजी आमदार राजेश नरसिंगराव पाटील, अरुणराव गणपतराव डोंगळे, राहुल पांडुरंग उर्फ पी. एन. पाटील, रणजितसिंह कृष्णराव उर्फ के. पी. पाटील, युवराज दत्ताजीराव पाटील, सतीश भीमगोंडा पाटील, नवीद हसनसाहेब मुश्रीफ, सौ. अर्चना आनंदराव उर्फ ए. वाय. पाटील, रणजीत दिलीप पाटील, सौ. शौमिका अमल महाडिक, अंबरीशसिंह संजय घाटगे, चेतन अरुण नरके, दीपक भरमू पाटील, अशोक काशिनाथ चराटी, प्रतापसिंह शंकरराव पाटील, विश्वास शंकर जाधव, विश्वास नारायण पाटील (आबाजी), अजित शशिकांत नरके, संभाजी रंगराव पाटील, अजित पांडुरंग पाटील, ॲड. वीरेंद्र संजय मंडलिक, मदन बाबुराव देसाई, डॉ. सुजित वसंतराव मिणचेकर, कर्णसिंह संजयसिंह गायकवाड आणि अमरसिंह यशवंत पाटील यांचा समावेश आहे.
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने या आघाडीच्या माध्यमातून आपले उमेदवार मैदानात उतरवले असून, निवडणुकीत आता राजकीय हालचालींना वेग आला आहे.
गोकुळ दूध संघ निवडणुकीसाठी महायुतीच्या ‘छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी’ची घोषणा
|