बातम्या

विवेकानंद कॉलेजमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti celebrated at Vivekananda College


By Administrator - 2/19/2026 1:09:54 PM
Share This News:



विवेकानंद कॉलेजमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

 कोल्हापूर दि. 19 : विवेकानंद कॉलेजमध्ये  इतिहास विभागाच्या वतीने  हिंदवी स्वराज्य्‍  संस्थापक व संकल्पक  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती साजरी करण्यात आली.   याप्रसंगी डॉ. एस.पी.थोरात यांच्या   यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन  करणेत आले.

यावेळी प्रास्ताविक व स्वागत इतिहास विभाग प्रमुख डॉ.एस.आर.कटृटीमनी  यांनी केले. याप्रसंगी  बोलताना ते म्हणाले,  जातीधर्माच्या भिंती भेदून, माणसाला माणूसकीने जगायला शिकवणारे राज्य्‍ म्हणजे शिवरायांचे स्वराज्य्‍.   शिवाजी महाराज हे मानवी मूल्ये जोपासणारे प्रगल्भ्‍ विचारांचे तत्ववेता राजे होते. ते समतावादी होते . मानवी मूल्यांसाठी त्यांनी कधीही तडजोड केली नाही.   लोककल्याणकारी शासनव्यवस्था हे त्यांचे अंतिम ध्येय होते.  त्यांच्या निस्पृह, निष्कलंक चारित्र्याने बांधलेली नैतिकता स्वराज बांधणीचा मजबूत पाया घालून गेले.  ज्यावर आज आपण संपन्न्‍ आणि समृध्द् शाश्वत जीवन जगत आहोत असे मत त्यांनी मांडले.

 पन्हाळा येथे आयोजित करण्यात आलेल्या पदयात्रेमध्ये महाविद्यालयातील एन.एस.एस. स्वयंसेवक व एन.सी.सी. विभागातील छात्र  तसेच प्रा.कॅप्टन सुनिता भोसले व प्रा.डॉ. संदीप पाटील उपस्थित होते.

यावेळी इतिहास विभागातील प्रा. डॉ. अनिल जांभळे यांनी छत्रपती शिवरायांविषयी आपले विचार व्य्‍क्त्‍ केले व शिवराजनीती जाणून घेण्यासाठी जाणत्या राजाचे विचार आत्मसात करणे गरजेचे आहे असे मत मांडले.

 प्रा. डॉ. अश्विनी खवळे  यांनी कार्यक्रमाचे आभार व्यक्त केले. यावेळी   ज्युनिअर, सिनिअर कॉलेज प्राध्यापक  प्रशासकीय कर्मचारी  ,महाविद्यालयाचे प्रबंधक श्री. एस के. धनवडे, व विद्यार्थी, विद्यार्थिनी  या कार्यक्रमास उपस्थित होत्या.


विवेकानंद कॉलेजमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी
Total Views: 15