बातम्या

महावितरणचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर बुधवारी (दि.25) आकाशवाणीवर

Chief Engineer of Mahavitaran Swapnil Katkar on Wednesday 25th on All India Radio


By nisha patil - 2/24/2026 5:54:46 PM
Share This News:



महावितरणचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर बुधवारी (दि.25) आकाशवाणीवर

स्मार्ट वीज मीटर (टीओडी) बाबत वीज ग्राहकांच्या शंकांचे होणार निरसन

कोल्हापूर : तंत्रज्ञान हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनला असून, काळानुसार त्यात सातत्याने बदल होत आहेत. यांत्रिक उपकरणांपासून ते डिजिटल आणि स्मार्ट तंत्रज्ञानापर्यंतचा प्रवास आपण सर्वच क्षेत्रांत अनुभवत आहोत. घड्याळ, टीव्ही, रेडिओ, कॉम्प्युटर, मोबाईल यांसारख्या साधनांप्रमाणेच आता वीज मोजणीच्या क्षेत्रातही स्मार्ट तंत्रज्ञानाने प्रवेश केला आहे. याच पार्श्वभूमीवर महावितरणकडून राज्यातील ग्राहकांसाठी स्मार्ट टीओडी (टाईम ऑफ डे) वीजमीटर बसवण्यात येत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात ५ लाख ७५ हजार इतके तर सांगली जिल्ह्यात ३ लाख ७१ हजार इतके र्स्माट मीटर (टीओडी) बसविण्यात आले आहेत. या स्मार्ट मीटरच्या फायद्यांविषयी महावितरणचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांनी आकाशवाणी कोल्हापूरवरुन प्रसारीत होणाऱ्या मुलाखतीत माहिती दिली आहे.

    महावितरणच्या स्मार्ट वीज मीटर(टीओडी) याबाबत वीज ग्राहकांच्या मनात असणाऱ्या शंकांचे निरसन आकाशवाणी कोल्हापूर वरून प्रसारित होणाऱ्या या मुलाखतीतून होणार आहे. कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांची बुधवारी (दि.25) रोजी आकाशवाणी कोल्हापूर (102.7 मे.ह.) वरून सकाळी 10.00 वाजता ही मुलाखत प्रसारित होणार आहे. आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी प्रवीण चिपळूणकर यांनी ही मुलाखत घेतली आहे. वीज ग्राहकांच्या दृष्टीने या मुलाखतीत देण्यात येणारी माहिती अत्यंत महत्वाची आहे. वीज ग्राहकांनी आपल्या शंकांची निरसन होण्‍याच्या दृष्टीने ही मुलाखत आवर्जून ऐकावी, असे आवाहन महावितरण करत आहे.


महावितरणचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर बुधवारी (दि.25) आकाशवाणीवर
Total Views: 30