बातम्या

"सरन्यायाधीश भूषण गवई यांची शाहू छत्रपतींसोबत दिल्लीत सदिच्छा भेट; कोल्हापूर सर्किट बेंचबाबत चर्चा"

Chief Justice Bhushan Gavai


By nisha patil - 7/30/2025 3:11:27 PM
Share This News:



"सरन्यायाधीश भूषण गवई यांची शाहू छत्रपतींसोबत दिल्लीत सदिच्छा भेट; कोल्हापूर सर्किट बेंचबाबत चर्चा"

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांची मंगळवारी दिल्ली येथे खासदार शाहू छत्रपती यांनी सदिच्छा भेट घेतली. या भेटीत विविध विषयांवर अनौपचारिक चर्चा झाली.

गवई यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाल्यानंतर काही महिन्यांपूर्वी त्यांनी कोल्हापूरमधील न्यू पॅलेस येथे छत्रपती शाहू महाराजांचे दर्शन घेण्यासाठी भेट दिली होती. त्या वेळी छत्रपती परिवारातर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला होता. त्यावेळी गवई यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करत, “त्यांच्या धोरणांमुळे आमच्यासारख्या बहुजन समाजातील मुलांना शिक्षणाची संधी मिळाली,” असे उद्गार काढले होते.

त्यावेळी दिलेल्या आमंत्रणानुसार, मंगळवारी दिल्ली येथे दोघांची पुन्हा भेट झाली. या भेटीदरम्यान खासदार शाहू छत्रपती यांनी कोल्हापूरमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच सुरू करण्याची आवश्यकता सरन्यायाधीश गवई यांच्यासमोर मांडली. कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी अशा भागातील जनतेसाठी सर्किट बेंचची गरज किती तीव्र आहे, याविषयी मुद्देसूद चर्चा करत ही मागणी त्यांनी पुन्हा अधोरेखित केली.

“आपल्या कार्यकाळातच हे सर्किट बेंच सुरू व्हावे,” अशी आग्रही इच्छा त्यांनी गवई यांच्याकडे व्यक्त केली. या बैठकीस माजी आमदार मालोजीराजे हे देखील उपस्थित होते.


"सरन्यायाधीश भूषण गवई यांची शाहू छत्रपतींसोबत दिल्लीत सदिच्छा भेट; कोल्हापूर सर्किट बेंचबाबत चर्चा"
Total Views: 58