राजकीय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कोल्हापूर येथे आगमन

Chief Minister Devendra Fadnavis arrives in Kolhapur


By nisha patil - 5/11/2025 12:21:37 PM
Share This News:



कोल्हापूर दि. ५ : पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज साडेदहाच्या सुमारास कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक ज्येष्ठ मंत्र्यांचेही यावेळी आगमन झाले. कोल्हापूर येथील पोलीस परेड ग्राउंडवर हा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा होणार आहे. 

यावेळी विधान परिषद सभापती राम शिंदे, विधान सभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचेही मुख्यमंत्री महोदयांसोबत आगमन झाले. जिल्हा प्रशासनामार्फत विमानतळावर मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, महापालिका आयुक्त के.मंजूलक्ष्मी यांनी त्यांचे स्वागत केले.

  यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, आमदार सत्यजित देशमुख, आमदार अमल महाडिक, आमदार शिवाजीराव पाटील, सांगली जिल्हाधिकारी अशोक काकडे, माजी आमदार प्रकाश आवाडे, माजी खासदार प्रभाकर कोरे, माजी आमदार सुरेश हळवणकर, माजी आमदार जयश्री जाधव उपस्थित होते.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कोल्हापूर येथे आगमन
Total Views: 22