ताज्या बातम्या
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वडगाव येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न
By nisha patil - 7/22/2025 7:31:44 PM
Share This News:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वडगाव येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न
९१ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग; आमदार अशोकराव माने यांच्या उपस्थितीत कार्यक्रमास उत्साही प्रतिसाद
वडगाव (हातकणंगले) | प्रतिनिधी – किशोर जासुद महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वडगाव (ता. हातकणंगले) येथे आज दिनांक २२ जुलै २०२५ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
.jpg)
या शिबिराचे आयोजन हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार व दलित मित्र मा. श्री. अशोकराव माने (बापू) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून, त्यांची शिबिरात प्रमुख उपस्थिती लाभली.
या उपक्रमात एकूण ९१ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले.
कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे रक्तदात्यांना आमदार अशोकराव माने व इतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.
.jpg)
शिबिरास विविध भाजप पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लाभली, त्यामध्ये –
-
भाजपा कोल्हापूर महिला जिल्हा (पूर्व) अध्यक्षा सौ. पुष्पाताई पाटील
-
भाजपा कोल्हापूर पूर्व युवा जिल्हाध्यक्ष डॉ. अरविंद माने
-
भाजपा वडगाव मंडल अध्यक्ष अमरसिंह पाटील
-
भाजयुमो तालुका अध्यक्ष विश्वास माने (आप्पा)
-
माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी
-
भाजप नेते डॉ. अशोक चौगुले, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष तय्यब कुरेशी, शहर प्रमुख जगन्नाथ माने
-

तसेच दीपक ढाले, नानासो जाधव, सलीम मुलानी, गुरव काका, डॉ. अभय यादव, दिनेश सनगर, अमर पाटील, राजेंद्र मुळीक, धनंजय गोंदकर, मोहन पाटील, वैभव हिरवे, राजकुमार मिटारे, राजेंद्र जाधव, संतोष माळी, सुनील लाड, संभाजी बन्ने, अश्विन गुरव, प्रथमेश शिंदे, निलेश कांबळे, तुकाराम पाटील, विकास कांबळे, अमित सुतार, युवराज वाळवकर, सुरेखा सूर्यवंशी, बानू नदाफ, संजीवनी पाटील, अर्चना भोपळ, वंदना माने, सीमा काटकर, स्वाती तनवडे, पूजा सूर्यवंशी यांच्यासह भाजप कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो अशी मनोकामना व्यक्त केली.
"राजकारणासोबत समाजकार्य हीच खरी कृतज्ञता" या भावनेतून मुख्यमंत्री महोदयांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी भाजप वडगाव मंडळ व स्थानिक कार्यकर्त्यांचे विशेष योगदान लाभले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वडगाव येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न
|