विशेष बातम्या
इचलकरंजीत 713 कोटींच्या विकासकामांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
By nisha patil - 5/23/2025 4:11:32 PM
Share This News:
इचलकरंजीत 713 कोटींच्या विकासकामांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
शहापूर पोलीस स्टेशनचे उद्घाटन, नर्सिंग कॉलेज, रस्ते व पाण्याच्या टाक्यांसह विविध कामांना गती
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील 713 कोटी रुपयांहून अधिक विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजन आणि लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. यावेळी माजी मंत्री आमदार प्रकाश आवाडे व आमदार डॉ. राहुल आवाडे उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी शहापूर पोलीस स्टेशनच्या इमारतीचे उद्घाटन करत नूतन इमारतीची पाहणी केली. तसेच शहराच्या सर्वांगीण विकासासाठी येणाऱ्या प्रस्तावांना तातडीने मंजुरी देण्याचे आश्वासन दिले.
यात UIDSSMT योजनेंतर्गत भूयारी गटार योजना, नगरोत्थान अभियानातील गटाराचे बळकटीकरण, सहा पाण्याच्या टाक्या, दाबनलिका व पंपिंग स्टेशन उभारणी, 10 रस्त्यांचे भूमिपूजन, नर्सिंग कॉलेज, शहापूर पोलीस स्टेशन आदी कामांचा समावेश आहे.
कार्यक्रमास पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, तसेच विविध मान्यवर अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
इचलकरंजीत 713 कोटींच्या विकासकामांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
|