ताज्या बातम्या
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कोल्हापुरात जंगी स्वागत
By nisha patil - 12/1/2026 4:07:24 PM
Share This News:
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रचारासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे करवीर नगरीत आगमन झाले. कोल्हापूर विमानतळावर महायुतीचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत जाधव, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे उत्साहपूर्ण व जंगी स्वागत केले.
आगामी महापालिका निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना बळ देण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. यावेळी चंद्रकांत जाधव यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी कोल्हापूर शहराच्या विकासासंदर्भातील विविध मुद्द्यांवर चर्चा केली.
या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस विविध प्रचार सभांना संबोधित करणार असून केंद्र व राज्य सरकारच्या योजना, शहरातील विकासकामे आणि कोल्हापूरच्या सर्वांगीण प्रगतीचा आराखडा नागरिकांसमोर मांडणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीमुळे महायुतीच्या प्रचाराला अधिक धार मिळाली असून कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीतील राजकीय हालचालींना वेग आला आहे.
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कोल्हापुरात जंगी स्वागत
|