बातम्या

मुख्यमंत्री फडणवीसांचा माणिकराव कोकाटेंवर मोठा निर्णय

Chief Minister Fadnavis


By nisha patil - 4/18/2025 4:23:00 PM
Share This News:



मुख्यमंत्री फडणवीसांचा माणिकराव कोकाटेंवर मोठा निर्णय

 कृषी खात्यातील बदल्यांचे अधिकार घेतले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना मोठा झटका दिला आहे. कृषी खात्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार कोकाटे यांच्या कडून घेऊन ते आता फडणवीस यांनी स्वतः आपल्या कडे घेतले आहेत. याशिवाय, सामान्य राज्य सेवा गट अ आणि ब, महाराष्ट्र कृषी सेवा गट अ आणि ब (कृषी उपसंचालक, तालुका कृषी अधिकारी) आणि अन्य संवर्गातील नियतकालिक बदल्यांचे अधिकार कृषी आयुक्तांना देण्यात आले आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे माणिकराव कोकाटे यांच्या बदल्यांचे अधिकार मर्यादित झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. कोकाटे यांना कोर्टाने एका प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे, आणि त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. तसेच, काही दिवसांपूर्वी कोकाटे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती.


मुख्यमंत्री फडणवीसांचा माणिकराव कोकाटेंवर मोठा निर्णय
Total Views: 131