बातम्या
मुख्यमंत्री फडणवीस यांचा कोल्हापूरकरांच्या वतीने सत्कार
By nisha patil - 9/5/2025 3:38:38 PM
Share This News:
मुख्यमंत्री फडणवीस यांचा कोल्हापूरकरांच्या वतीने सत्कार
साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या करवीर निवासिनी जगतजननी श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी भरीव निधी मिळावा ही समस्त कोल्हापूरकरांची इच्छा होती. करवीरकरांच्या इच्छापूर्तीसाठी आ. अमल महाडिक यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी तब्बल १४४५ कोटी रुपयांचा निधी श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी तसेच श्रीक्षेत्र जोतिबा मंदिर विकास आराखड्यासाठी २५९ कोटी रुपयांचा निधी नुकताच जाहीर केला. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल समस्त कोल्हापूरकरांच्यावतीने आ. अमल महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार केला. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई आणि दख्खनचा राजा श्री जोतिबाचे आशीर्वाद नेहमीच आपल्या पाठीशी राहतील अशा शुभेच्छा आ. अमल महाडिक यांनी याप्रसंगी त्यांना दिल्या.
मुख्यमंत्री फडणवीस यांचा कोल्हापूरकरांच्या वतीने सत्कार
|