ताज्या बातम्या

मुख्यमंत्री ना.मा.श्री.देवेंद्र फडणवीस यांची आमदार राजेश क्षीरसागर यांच्या निवासस्थानी सदीच्छा भेट

Chief Minister Shri Devendra Fadnavis pays a courtesy visit to the residence of MLA Rajesh Kshirsagar


By nisha patil - 12/1/2026 4:55:42 PM
Share This News:



आज कोल्हापूर दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री ना.मा.श्री.देवेंद्र फडणवीस यांनी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांचे निवासस्थानी सदीच्छा भेट दिली. यावेळी नवदांपत्य श्री.पुष्कराज क्षीरसागर आणि सौ.पूजा क्षीरसागर यांना विवाह निमित्त शुभेच्छा दिल्या. यासह आमदार राजेश क्षीरसागर हे १९८६ पासून शिवसेनेशी आणि भगव्या विचारांशी एकनिष्ठ आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील हिंदुत्ववादी चळवळीना बळ देत हिंदुत्व जपण्याचे काम केले आहे.  बरेच वर्ष त्यांनी जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघर्ष केला आहे. 

 

सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, आरोग्य आणि विकासात्मक कामात नेहमीच अग्रेसर राहिले आहेत, अशा पद्धतीने आमदार राजेश क्षीरसागर यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच त्यांच्याच पाऊलावर पाऊल टाकत त्यांची दोन्ही मुले श्री.ऋतुराज क्षीरसागर आणि श्री.पुष्कराज क्षीरसागर हेही समाजकार्यात सहभागी झाले आहेत. युवकांनी समाजकार्यासह राजकारणात पुढे येणे गरजेचे असून, ऋतुराज आणि पुष्कराज यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर आणि शिवसेना कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने मुख्यमंत्री ना.मा.श्री.देवेंद्र फडणवीस यांचा चांदीची तलवार, शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

 

यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या माजी कोषाध्यक्षा सौ.वैशाली क्षीरसागर, सौ.दिशा क्षीरसागर, सौ.पूजा क्षीरसागर  आदी उपस्थित होते.


मुख्यमंत्री ना.मा.श्री.देवेंद्र फडणवीस यांची आमदार राजेश क्षीरसागर यांच्या निवासस्थानी सदीच्छा भेट
Total Views: 160