बातम्या

ब्ल्यू किचनच्या स्वच्छता मोहिमेची मुख्यमंत्र्यांकडून दखल; देवराज जाधव यांचा सन्मान!

Chief Minister acknowledges Blue Kitchen


By nisha patil - 11/19/2026 3:12:30 PM
Share This News:



ब्ल्यू किचनच्या स्वच्छता मोहिमेची मुख्यमंत्र्यांकडून दखल; देवराज जाधव यांचा सन्मान!

सामाजिक बांधिलकी जपत हॉटेल ब्ल्यू किचनच्या टीमने कॉंडोलीम बीच परिसरात स्वच्छता मोहीम राबवून पर्यटकांसमोर स्वच्छतेचा आदर्श निर्माण केला. या मोहिमेत हॉटेलच्या स्टाफने उत्स्फूर्त सहभाग घेत बीच परिसराची स्वच्छता केली. तसेच पर्यटकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करून सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याचा संदेश दिला.

या स्तुत्य सामाजिक उपक्रमाची दखल घेत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी देवराज जाधव आणि हॉटेल ब्ल्यू किचनच्या संपूर्ण टीमचे विशेष कौतुक केले. या सामाजिक कार्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आभारपत्र देऊन टीमचा सन्मान करण्यात आला. यावेळी जाधव परिवाराच्या वतीने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना आई अंबाबाईची सुंदर फ्रेम भेट देऊन त्यांचाही सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी अमर जाधव, रुपाली अमर जाधव, देवराज जाधव तसेच मित्रपरिवार उपस्थित होता. व्यावसायिक जबाबदारीसोबतच सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


ब्ल्यू किचनच्या स्वच्छता मोहिमेची मुख्यमंत्र्यांकडून दखल; देवराज जाधव यांचा सन्मान!
Total Views: 16