राजकीय

मुख्यमंत्री लबाड; शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा – प्रकाश पाटील

Chief Minister is a liar


By nisha patil - 12/8/2025 2:43:33 PM
Share This News:



मुख्यमंत्री लबाड; शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा – प्रकाश पाटील

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शिवसेनेची दिंडी भुदरगडात पोहोचली

भुदरगड प्रतिनिधी – प्रकाश खतकर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सुरू असलेली शेतकरी दिंडी चंदगडमधून भुदरगड तालुक्यातील वेसर्डे, कडगांव आणि करडवाडी या ठिकाणी दाखल झाली. यावेळी महिलांनी जल्लोषात स्वागत करत फुलांच्या उधळणीत दिंडीचे स्वागत केले. शेतकरी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कडगांव येथे उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी भाषण करताना, "वर्तमान मुख्यमंत्री सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती, पण ती आजतागायत पूर्ण झाली नाही. अशा लबाड मुख्यमंत्र्याला पांडुरंग सद्बुद्धी देवो आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा" अशी घणाघाती टीका केली. तसेच शेतीपंपाचे वीजबिल १०० टक्के माफ करणे, पाणीपट्टी पूर्णपणे माफ करणे, जीवनावश्यक वस्तूंच्या वाढलेल्या किमती कमी करणे अशा अनेक मागण्या त्यांनी मांडल्या.

करडवाडी येथे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख विजय देवणे, सहसंपर्कप्रमुख रियाजभाई शमणजी, जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, राज्य संघटक चंगेजभाई पठाण, माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण, तालुका संघ संचालक बचाराम गुरव, उपतालुका प्रमुख अशोक पाटील, विभाग प्रमुख विल्सन बारदेस्कर,  यांच्यासह शेतकरी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मुख्यमंत्री लबाड; शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा – प्रकाश पाटील
Total Views: 46