बातम्या
कारागृह घोटाळ्यात मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप? – राजू शेट्टींचा आरोप
By nisha patil - 6/20/2025 6:46:16 PM
Share This News:
कारागृह घोटाळ्यात मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप? – राजू शेट्टींचा आरोप
तेजस मोरेच्या माध्यमातून कारागृहातील घोटाळ्यावर पांघरूण – शेट्टींचा दावा
राज्यातील कारागृह विभागात ५०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करत राजू शेट्टी यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट आरोप केला.त्यांच्या मते, तत्कालीन अप्पर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता, IG जालिंदर सुपेकर व मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय तेजस मोरे यांच्यातील संबंधांमुळे चौकशी दाबली जात आहे.
तेजस मोरेवर फसवणुकीचे गुन्हे असतानाही त्याचा मंत्रालयात मुक्त वावर, आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंधामुळे तो अनेक प्रशासकीय कामांमध्ये सक्रिय आहे, असा दावा शेट्टींनी केला.मुख्यमंत्र्यांकडे चौकशीसाठी वेळ मागितल्यावर त्यांनी टाळाटाळ केल्याचाही आरोप त्यांनी केला. त्यांनी या प्रकरणाची ईडी व सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे.
कारागृह घोटाळ्यात मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप? – राजू शेट्टींचा आरोप
|