बातम्या

महाराष्ट्र, गोवा पोस्टल सर्कलच्या मुख्य पोस्टमास्टरनी घेतली खासदार छत्रपती शाहू महाराजांची भेट

Chief Postmaster of Maharashtra


By nisha patil - 9/18/2025 5:47:53 PM
Share This News:



महाराष्ट्र, गोवा पोस्टल सर्कलच्या मुख्य पोस्टमास्टरनी घेतली खासदार छत्रपती शाहू महाराजांची भेट

कोल्हापूर, दि. 18 : महाराष्ट्र आणि गोवा पोस्टल सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर जनरल (सीपीएमजी) अमिताभसिंग, भाडासे, यांनी खासदार छत्रपती शाहू महाराज यांची सदिच्छा भेट घेतली. भेटी दरम्यान त्यांनी महाराष्ट्र आणि गोवा सर्कलमधील विविध उपक्रम आणि विकासावर विशेष भर देऊन भारतीय पोस्ट खात्याने हाती घेतलेल्या कामाची माहिती दिली.

छत्रपती शाहू महाराजांनी टपाल सेवांमध्ये उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या एकात्मिकतेमध्ये, विशेषतः डिलिव्हरीसाठी ड्रोनचा वापर करण्यामध्ये उत्सुकता व्यक्त केली. भविष्यात ड्रोन-आधारित डिलिव्हरी सिस्टमला समर्थन देण्यासाठी समर्पित पायाभूत सुविधांची संभाव्य गरज यावरही चर्चा झाली.

अमिताभसिंग यांनी इंडिया पोस्टने सादर केलेली नाविन्यपूर्ण डिजिपिन संकल्पनेबद्दल विस्तृत माहिती दिली. ज्यामध्ये डिजिटल पिन कसा तयार केला जातो आणि डिलिव्हरीची अचूकता आणि पत्ता डिजिटायझेशन वाढवण्यात त्याचे महत्त्व सांगितले. यावेळी टपाल नेटवर्क अधिक मजबूत करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी सामायिक दृष्टिकोन यावर चर्चा झाली.


महाराष्ट्र, गोवा पोस्टल सर्कलच्या मुख्य पोस्टमास्टरनी घेतली खासदार छत्रपती शाहू महाराजांची भेट
Total Views: 70