बातम्या
वालावलकर हायस्कूलमध्ये बालदिनाचा उत्साह; विद्यार्थ्यांनी नेहरू जयंती साजरी!
By nisha patil - 11/14/2026 3:09:00 PM
Share This News:
वालावलकर हायस्कूलमध्ये बालदिनाचा उत्साह; विद्यार्थ्यांनी नेहरू जयंती साजरी!
आंतर भारती शिक्षण मंडळ संचलित मुक्तसैनिक विद्यापीठांतर्गत असलेल्या शांतारामपंत वालावलकर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती अर्थात बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. इयत्ता सातवी 'अ' च्या विद्यार्थ्यांनी बालदिनानिमित्त तयार केलेल्या विशेष भित्तीपत्रकाचे अनावरणही मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमात इयत्ता सातवी 'अ' मधील विद्यार्थिनी सई चौगुले हिने आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संयोजन वर्गशिक्षिका प्रविणा खोत यांनी केले. तर त्यांनीच उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाला प्रशांत भोसले, तृप्ती गावित, अनुपमा पन्हाळकर, शीतल अलमान, विश्वास माळी यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
वालावलकर हायस्कूलमध्ये बालदिनाचा उत्साह; विद्यार्थ्यांनी नेहरू जयंती साजरी!
|