विशेष बातम्या

Chimgaon poisoning case:चिमगांव विषबाधा प्रकरण : मृत बालकाच्या कुटुंबाला शासकीय आर्थिक मदत

Chimgaon poisoning case


By nisha patil - 5/7/2025 8:10:33 PM
Share This News:



चिमगांव विषबाधा प्रकरण : मृत बालकाच्या कुटुंबाला शासकीय आर्थिक मदत

कागल, दि. ५ : चिमगांव (ता. कागल) येथे सहा महिन्यांपूर्वी केकमधून विषबाधा होऊन मृत्यू झालेल्या चिमुकल्याच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयांची शासकीय आर्थिक मदत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली.

रणजीत अंगज यांच्या दोन मुलांना विषबाधा झाली होती. त्यातील कु. श्रीयांश याचा मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्य सरकारकडून मदतीसाठी पाठपुरावा केला होता.

या प्रसंगी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, तहसीलदार अमरदीप वाकडे, सरपंच दीपक अंगज, मंडल अधिकारी कुलदीप गवंडी, प्रशांत गुरव, नामदेव मांगले आदी उपस्थित होते.

मंत्री मुश्रीफ यांनी कुटुंबाला धीर देत, त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा विश्वास दिला. मानवी संवेदनेतून दिलेली ही मदत ग्रामस्थांच्या मनाला स्पर्शून गेली.


Chimgaon poisoning case:चिमगांव विषबाधा प्रकरण : मृत बालकाच्या कुटुंबाला शासकीय आर्थिक मदत
Total Views: 130