बातम्या
धुणीभांडी करणाऱ्या चिन्नवाचे शालांत परीक्षेत ७५% गुण;
By nisha patil - 5/17/2025 3:45:46 PM
Share This News:
धुणीभांडी करणाऱ्या चिन्नवाचे शालांत परीक्षेत ७५% गुण;
संघर्षातून उभा राहिलेला उज्ज्वल आदर्श
कोल्हापूरच्या सदर बाजार भागातील कोरगावकर हायस्कूलमधील दहावीच्या विद्यार्थिनी चिन्नवा राजू कारीगर हिने ७५% गुण मिळवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. चिन्नवाची आई गीता कारीगर ही घरगुती कामे करून उदरनिर्वाह करते. चिन्नवादेखील आईसोबत धुणीभांडी करून शिक्षण घेत होती. परीक्षा काळात वडिलांचे निधन, अपुरं घर, आर्थिक चणचण या सर्व अडचणींना तोंड देत तिने यश मिळवलं.
तिला ताराबाई पार्कमधील ईगल पाईपचे प्रोप्रायटर अनिल चौहाण व त्यांच्या पत्नी इला चौहाण, तसेच समुपदेशक विठ्ठल कोतेकर यांनी खंबीर साथ दिली. अभ्यासासाठी राहण्याची व्यवस्था, मानसिक आधार व वेळोवेळी प्रोत्साहन मिळाल्याने चिन्नवाच्या यशात या दांपत्यांचा मोठा वाटा आहे. शाळेचे मुख्याध्यापक संजय सौंदलगे, वर्गशिक्षक रणधीर मिरजकर, व शिक्षिका प्रमिला साजणे, सुरेखा पोवार यांनीही विशेष मेहनत घेतली.
शाहू महाविद्यालयात प्रवेश घेऊन यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी होण्याचं तिचं स्वप्न आहे. कोरगावकर शाळेने तिच्या सत्काराचे नियोजन केलं असून, चौहाण दांपत्याने तर तिला आर्थिक मदत केलीच आहे पण चिन्नवासाठी अजूनही शैक्षणिक खर्च, स्पर्धा परीक्षा तयारीसाठी साहित्य, मार्गदर्शन यासाठी दानशूर व्यक्ती, संस्था, आणि संघटनांनी पुढे येण्याची गरज आहे
धुणीभांडी करणाऱ्या चिन्नवाचे शालांत परीक्षेत ७५% गुण;
|