बातम्या

 वाढीव पाणी बिलांवर नागरिक आक्रमक; जलअभियंता हर्षजीत घाटगे यांच्यासोबत बैठक

Citizens are aggressive over increased water bills


By Administrator - 2/25/2026 4:46:19 PM
Share This News:



 वाढीव पाणी बिलांवर नागरिक आक्रमक; जलअभियंता हर्षजीत घाटगे यांच्यासोबत बैठक
 

कोल्हापूर शहरातील सी आणि डी वॉर्डमधील वाढीव पाणी बिलांबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते सुशिल सुधाकर भांदिगरे यांनी आज जलअभियंता हर्षजीत घाटगे यांची भेट घेऊन वाढीव बिलांबाबत जाब विचारला.
 

बैठकीदरम्यान संबंधित भागातील मीटर रीडर यांनी प्रत्येक नागरिकांच्या घरी जाऊन मागील चार महिन्यांचे बिल आणि सध्या आलेले वाढीव बिल यांची तुलना करण्याचा निर्णय घेण्यात आला. बिलातील तफावत तपासून त्याचा सविस्तर अहवाल तयार करून तो जलअभियंत्यांना सादर केला जाणार आहे. सोमवारी या अहवालाच्या आधारे अंतिम निर्णय घेण्याचे ठरले आहे.
 

दरम्यान, पाणी बिल रीडर यांनी आज संबंधित ग्राहकांशी भेट घेऊन मागील चार महिन्यांच्या बिलांची व मीटरची तपासणी करत नोंदी केल्या. सर्वेक्षण पूर्ण करून त्याचा अहवाल जलअभियंता कार्यालयाकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.
 

नागरिकांनी मीटर रीडर घरी आल्यास मागील चार महिन्यांची बिले व सध्या आलेले वाढीव बिल दाखवून योग्य माहिती द्यावी, असे आवाहन सुशिल भांदिगरे यांनी केले आहे. सोमवारी होणाऱ्या निर्णयाकडे आता नागरिकांचे लक्ष लागले असून वाढीव बिलांवर दिलासा मिळणार का, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.


 वाढीव पाणी बिलांवर नागरिक आक्रमक; जलअभियंता हर्षजीत घाटगे यांच्यासोबत बैठक
Total Views: 14