बातम्या

पाल घाटात गारगोटी ग्रामपंचायतीकडून कचरा टाकण्यामुळे नागरिक त्रस्त..

Citizens are suffering due to Gargoti t


By nisha patil - 9/17/2025 5:39:23 PM
Share This News:



पाल घाटात गारगोटी ग्रामपंचायतीकडून कचरा टाकण्यामुळे नागरिक त्रस्त..

चिकन कचऱ्यामुळे भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढला; नागरिकांमध्ये संताप

प्रतिनिधी ओंकार सावंत :  निसर्गसंपन्न पाल घाट परिसर कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे विद्रूप झाला आहे. गारगोटी ग्रामपंचायतीकडून नियमितपणे येथे कचरा टाकला जात असल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे वाहनधारक तसेच आजूबाजूच्या गावांतील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

पाल ग्रामपंचायतीकडून वारंवार निवेदन देऊनही गारगोटी ग्रामपंचायतीने कचरा टाकणे सुरूच ठेवले आहे. या कचऱ्यात चिकन दुकानदारांकडून टाकण्यात येणारी पिसं, स्किन व इतर अवशेषांचा समावेश असल्याने समस्या अधिक गंभीर झाली आहे. यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून ते नागरिक आणि वाहनधारकांवर हल्ला करण्याची भीती निर्माण झाली आहे.

विशेष म्हणजे, हा परिसर वनविभागाच्या हद्दीत असूनही विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या सगळ्या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे आणि कचरा टाकणे तातडीने थांबवावे, अशी जोरदार मागणी होत आहे.

 


पाल घाटात गारगोटी ग्रामपंचायतीकडून कचरा टाकण्यामुळे नागरिक त्रस्त..
Total Views: 45