विशेष बातम्या

नागरिकांनी मृत्यू पश्चात अवयवदानाची नोंदणी करावी

Citizens should register for organ donation after death


By nisha patil - 11/8/2025 5:56:15 PM
Share This News:



नागरिकांनी मृत्यू पश्चात अवयवदानाची नोंदणी करावी

कोल्हापूर, दि. 11  : अवयवदान हे मानवतेचे सर्वोच्च रूप आहे. एखाद्या मरणोत्तर व्यक्तीच्या अवयवांमुळे अनेक रुग्णांना नवजीवन मिळू शकते. इतरांच्या जीवनात आशा आणि संजीवनी देऊ शकतात. यासाठी समाजात जनजागृती करणे, अंधश्रद्धा व गैरसमज दूर करणे, तसेच वैद्यकीय यंत्रणेसोबत समन्वय साधणे अत्यावश्यक आहे. नागरिकांनी मृत्यू पश्चात अवयवदानाची तयारी दर्शवून नोंदणी करुन जनजागृतीस हातभार लावावा.

समाजामध्ये याबाबत सकारात्मक वातावरण निर्माण व्हावे, यासाठी इतर शासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी पुढाकार घेऊन एकत्रितपणे प्रयत्न करुया, असे आवाहन आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळाचे उपसंचालक डॉ. दिलीप माने यांनी केले आहे. 
 

सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य अंतर्गत संपूर्ण राज्यामध्ये अंगदान जीवन संजीवनी अभियान राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रातील अवयवदानाचे प्रमाण वाढावे व अवयवदानाच्या प्रतिक्षेतील रूग्णांना नवसंजीवन मिळावे यासाठी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्वतः अवयवदानाची नोंदणी करुन दि. ०३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२५ दरम्यानच्या अवयवदान पंधरवड्याची सुरुवात केली आहे. अवयवदान ही एक चळवळ म्हणून राज्यभर चालविली जात आहे. उपसंचालक कार्यालय कोल्हापूर येथे या सप्ताहनिमित्त प्रतिज्ञा घेऊन कार्यालयातील नियमित व राष्ट्रीय आरोग्य अभियानचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अवयवदानाची नोंदणी केली आहे.  
 

त्याचबरोबर सार्वजनिक आरोग्य विभाग, उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ अंतर्गत अवयवदानाच्या नोंदणीसाठी दिलेल्या QR कोड व गुगल लिंकचा (https://notto.abdm.gov.in/register) वापर करून नागरिकांनी तसेच शासकीय इतर विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी अवयवदानाची नोंदणी करावी,असे आवाहन उपसंचालक डॉ. माने यांनी केले आहे.


नागरिकांनी मृत्यू पश्चात अवयवदानाची नोंदणी करावी
Total Views: 52