विशेष बातम्या

पूरपरिस्थितीत नागरिकांनी सतर्क राहावे – माजी नगराध्यक्षा नीता माने यांचे आवाहन

Citizens should remain vigilant in flood situations


By nisha patil - 8/23/2025 4:29:59 PM
Share This News:



पूरपरिस्थितीत नागरिकांनी सतर्क राहावे – माजी नगराध्यक्षा नीता माने यांचे आवाहन

शिरोळ, वाडी, कुरुंदवाड परिसरात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. आज पाऊस थांबलेला असला तरी पाण्याची पातळी संथ गतीने वाढतच आहे. दुपारी दोननंतर पाणी ओसरण्यास सुरुवात होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असला तरी काही भागांत पाणी घरात शिरल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.

कुरुंदवाडमधील कुंभार वाड्यातील घरे पाण्याखाली गेली असून, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तयार केलेल्या मूर्तींना पाण्याचा फटका बसला आहे. मूर्ती हलवताना मोठ्या प्रमाणावर धावपळ सुरू आहे.

अशा आपत्तीच्या प्रसंगी त्वरित प्रशासनाशी संपर्क साधावा, मदत मागावी, सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे तसेच स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी आणि शक्य तितकी इतरांनाही मदत करावी, असे आवाहन माजी नगराध्यक्षा सौ. नीता माने व त्यांच्या महिला सहकार्याने केला आहे.


पूरपरिस्थितीत नागरिकांनी सतर्क राहावे – माजी नगराध्यक्षा नीता माने यांचे आवाहन
Total Views: 95