बातम्या
वर्षानगरमध्ये एसटीपीला नागरिकांचा ठाम विरोध – महापालिकेवर मोर्चा, निवेदन सादर
By nisha patil - 9/19/2025 1:05:41 PM
Share This News:
वर्षानगरमध्ये एसटीपीला नागरिकांचा ठाम विरोध – महापालिकेवर मोर्चा, निवेदन सादर
“आरोग्य धोक्यात घालणारा प्रकल्प रद्द करा” – सर्वपक्षीय नेत्यांसह नागरिकांचा हक्काचा आवाज
वर्षानगर परिसरात नियोजित सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) कायमस्वरूपी रद्द करण्याच्या मागणीसाठी परिसरातील नागरिकांनी आज मोठा मोर्चा काढत महापालिकेवर धडक दिली. छत्रपती शिवाजी चौकातून सुरू झालेला हा मोर्चा महापालिका चौकात पोहोचला. यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
वृंदावन पार्क, अरिहंत पार्क, लाईफ स्टाईल अपार्टमेंट, अथर्व अपार्टमेंट, सभाजी हाउसिंग सोसायटीसह परिसरातील नागरिकांनी या प्रकल्पाला ठाम विरोध दर्शवला आहे. या प्रकल्पामुळे परिसरात दुर्गंधी पसरेल, हवा दूषित होईल, तसेच नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होईल, अशी भीती रहिवाशांनी व्यक्त केली.
नागरिकांनी स्पष्ट केले की, “आम्हाला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पास विरोध नाही; परंतु तो दाट लोकवस्तीच्या मध्यभागी उभारणे चुकीचे आहे. नदीपासून लांब आणि घनदाट वस्तीत एसटीपी झाल्यास आरोग्याचा मोठा धोका निर्माण होईल.”
या प्रकल्पाच्या जागेवर आधीच ११ झाडांसह चंदनाची झाडे तोडून सपाट करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. महापालिका प्रशासनाने वारंवार निवेदन दिल्यानंतरही गांभीर्य न घेताच प्रकल्पाचे काम सुरू केल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला.
महापालिका आयुक्त तथा प्रशासक मंजूलक्ष्मी यांना नागरिक आणि सर्वपक्षीय नेत्यांनी निवेदन देऊन हा प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी केली. या मोर्चात सर्वपक्षीय नेते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
वर्षानगरमध्ये एसटीपीला नागरिकांचा ठाम विरोध – महापालिकेवर मोर्चा, निवेदन सादर
|