राजकीय
🔴 निकालापूर्वीच विजयाचा दावा
By nisha patil - 12/21/2025 10:55:14 AM
Share This News:
कागल:- कागल नगरपरिषदेच्या निवडणूक निकालांपूर्वीच मंत्री हसन मुश्रीफ तसेच शाहू गटाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या समर्थकांकडून शहरात विविध ठिकाणी विजयाचे फलक झळकावण्यात आल्याने राजकीय वातावरण तापले आहे. निकाल जाहीर होण्याआधीच अशा प्रकारे विजय साजरा करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.
या फलकांमुळे निवडणूक आचारसंहितेचा भंग झाल्याचा दावा करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) शहरप्रमुख अजित मोडेकर यांनी यास तीव्र विरोध दर्शवला आहे. त्यांनी या प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी व तहसीलदारांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान, या प्रकाराची दखल घेत प्रशासन व पोलिसांनी फलक काढण्याच्या सूचना दिल्या असून, संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. निवडणूक निकाल जाहीर होण्यापूर्वीच राजकीय शक्तिप्रदर्शन केल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे.
कागल नगरपरिषदेचा निकाल काही तासांत जाहीर होणार असून, तोपर्यंत कोणताही विजयाचा दावा करणे अयोग्य असल्याची भूमिका विरोधी पक्षांकडून मांडली जात आहे.
🔴 निकालापूर्वीच विजयाचा दावा
|