शैक्षणिक
फेब्रुवारी–मार्च 2026 मध्ये दहावी व बारावीच्या परीक्षा; वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध
By nisha patil - 8/11/2025 5:09:43 PM
Share This News:
फेब्रुवारी–मार्च 2026 मध्ये दहावी व बारावीच्या परीक्षा; वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध
कोल्हापूर, दि. 8 : माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा फेब्रुवारी–मार्च 2026 मध्ये होणार आहेत. या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर 31 ऑक्टोबर 2025 पासून उपलब्ध आहे, अशी माहिती पुणे राज्यमंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी दिली.
दहावीची लेखी परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीत तर प्रात्यक्षिक परीक्षा 2 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी 2026 दरम्यान घेण्यात येणार आहेत.
बारावीची लेखी परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 पर्यंत होणार असून प्रात्यक्षिक व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2026 या कालावधीत होतील.
मंडळाने स्पष्ट केले आहे की संकेतस्थळावरील वेळापत्रक हे केवळ माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी शाळा किंवा महाविद्यालयांना देण्यात येणारे छापील वेळापत्रकच अंतिम मानले जाईल. सोशल मीडियावर व्हायरल होणारे वेळापत्रक ग्राह्य धरू नये, अन्यथा विद्यार्थ्याचे नुकसान झाल्यास मंडळ जबाबदार राहणार नाही.
फेब्रुवारी–मार्च 2026 मध्ये दहावी व बारावीच्या परीक्षा; वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध
|