शैक्षणिक
दहावीचा निकाल उद्या जाहीर! राज्यभरातील १६ लाख विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार
By nisha patil - 12/5/2025 2:32:11 PM
Share This News:
बारावीचा निकाल लागल्यानंतर आता सर्वांचं लक्ष दहावीच्या निकालाकडे लागलेलं आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीच्या निकालाबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. उद्या, १३ मे रोजी दुपारी १ वाजता दहावीचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे.
यंदा १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. पुणे, मुंबई, नागपूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात आली होती.
निकाल जाहीर होण्याआधी मंडळाकडून पत्रकार परिषद घेण्यात येणार असून, त्यामध्ये निकालाची आकडेवारी सविस्तरपणे जाहीर केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना mahresult.nic.in, sscresult.mkcl.org, आणि mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळांवर निकाल पाहता येईल.
उद्या लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा क्षण ठरणार असून, निकालानंतर प्रवेश प्रक्रिया आणि पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हालचालींना वेग येणार आहे.
दहावीचा निकाल उद्या जाहीर! राज्यभरातील १६ लाख विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार
|