बातम्या
शहाजी महाविद्यालयात अभिजात मराठी राजभाषा दिन उत्साहात संपन्न
By nisha patil - 5/10/2026 4:30:04 PM
Share This News:
शहाजी महाविद्यालयात अभिजात मराठी राजभाषा दिन उत्साहात संपन्न
कोल्हापूर : दसरा चौक येथील श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात अभिजात मराठी राजभाषा दिन विविध उपक्रमानी उत्साहात संपन्न झाला. या निमित्ताने वि. स.खांडेकर,
वि.वा.शिरवाडकर, विंदा करंदीकर आणि भालचंद्र नेमाडे यांच्या ज्ञानपीठ पारितोषिक प्राप्त साहित्यकृतींची ओळख करून देण्यात आली . यानिमित्ताने समृद्धी बाबासाहेब गुरव या विद्यार्थिनीने अभिजात मराठी भाषेचे महत्व या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले .
ज्ञानपीठ पारितोषिक प्राप्त साहित्यिकांच्या कलाकृतींचा माहितीपट यावेळी दाखवण्यात आला. मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ.दीपक कुमार वळवी यांनी स्वागत व प्रास्ताविक करून अभिजात मराठी भाषेबद्दल माहिती दिली.
श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे दादा व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांचे या उपक्रमास मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले. सूत्रसंचालन व आभार डॉ.पल्लवी कोडक यांनी मानले.
यावेळी डॉ आर डी मांडणीकर, डॉ.के.एम.देसाई, डॉ. ए .बी.बलुगडे,डॉ.रचना माने, प्रा. पंढरीनाथ पाटील, डॉ. एन. एस. जाधव सर्व प्राध्यापक ,प्रशासकीय सहकारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते .
शहाजी महाविद्यालयात अभिजात मराठी राजभाषा दिन उत्साहात संपन्न
|