ताज्या बातम्या
‘स्वच्छ रंकाळा, सुंदर रंकाळा’ अभियानाला पुन्हा वेग देण्याची गरज
By nisha patil - 10/11/2025 12:59:39 PM
Share This News:
कोल्हापूर : स्वच्छ रंकाळा, सुंदर रंकाळा’ या अभियानाला अलीकडे काहीसा ब्रेक बसल्याचे दिसत आहे. प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याने रंकाळा तलाव आणि त्याच्या तिरी परिसरात पुन्हा कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या उपक्रमाचे महत्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.
या परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी काही सामाजिक संस्था आणि स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेतला आहे. विशेष म्हणजे, तेथील काही नागरिकांनी परिसरातील कचऱ्याची तिरडी तयार करून त्यावर “मला येथून कायमच उचला” असे लिहून अनोख्या पद्धतीने प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
रंकाळा परिसरातील हे स्वच्छता अभियान यापूर्वी अत्यंत यशस्वी ठरले होते. मात्र, अलीकडे झालेल्या दुर्लक्षामुळे परिसर पुन्हा अस्वच्छ दिसू लागला आहे. काही स्वच्छता प्रेमी नागरिकांनी रंकाळा तलाव भाग स्वच्छ ठेवण्यासाठी पुन्हा एकदा चळवळीला नवा वेग देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
कोल्हापूर : ‘स्वच्छ रंकाळा, सुंदर रंकाळा’ अभियानाला पुन्हा वेग देण्याची गरज
|