बातम्या

शुद्ध पाणी प्रत्येक घरापर्यंत” –आवाडे यांच्या प्रयत्नांना उत्स्फूर्त प्रतिसाद

Clean water to every home


By nisha patil - 9/19/2025 1:04:04 PM
Share This News:



शुद्ध पाणी प्रत्येक घरापर्यंत” –आवाडे यांच्या प्रयत्नांना उत्स्फूर्त प्रतिसाद

 प्रकाशआण्णा आवाडे व आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते शुभारंभ

माजी मंत्री प्रकाशआण्णा आवाडे यांच्या मार्गदर्शनातून आणि आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून मंजूर झालेल्या पाणी साठवणुकीसाठी नवीन टाकीच्या पायाभरणीचा कार्यक्रम पी. बा. पाटील मळा, गाव भाग, साग, इचलकरंजी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमाचा शुभारंभ प्रकाशआण्णा आवाडे आणि आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. गाव भागातील नागरिकांच्या मूलभूत गरजांची जाणीव ठेवून, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पाणी पोहोचविण्याच्या उद्देशाने या प्रकल्पाचा आरंभ करण्यात आला.

भविष्यात ही नवीन टाकी गाव भागातील पाणीटंचाईचा प्रश्न मोठ्या प्रमाणात दूर करणार असून नागरिकांना पुरेशा प्रमाणात स्वच्छ पाणी उपलब्ध होणार आहे. या उपक्रमामुळे गावातील सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळणार असल्याचे मान्यवरांनी सांगितले.

कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या विकासकामाचे स्वागत केले. यावेळी बोलताना मान्यवरांनी प्रकाशआण्णा आवाडे व आमदार राहुल आवाडे यांच्या लोकाभिमुख कार्याची प्रशंसा केली. सातत्याने निधी खेचून आणून लोकहिताचे निर्णय घेणारे हे नेतृत्व इचलकरंजी परिसराच्या विकासाला गती देत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

या पाणी टाकीमुळे गाव भागातील प्रत्येक घरापर्यंत शुद्ध व पुरेशा प्रमाणात पाणी पोहोचण्याचे स्वप्न आता पूर्णत्वास जाणार आहे.


शुद्ध पाणी प्रत्येक घरापर्यंत” –आवाडे यांच्या प्रयत्नांना उत्स्फूर्त प्रतिसाद
Total Views: 79