बातम्या

गणपती विसर्जनापूर्वी नदीघाटाची स्वच्छता – बलशाली भारत सामाजिक संघटनेचा उपक्रम

Cleanliness of the river ghat before Ganpati immersion


By nisha patil - 1/9/2025 4:02:41 PM
Share This News:



गणपती विसर्जनापूर्वी नदीघाटाची स्वच्छता – बलशाली भारत सामाजिक संघटनेचा उपक्रम

“आपले गाव, आपले कर्तव्य” या घोषणेसह नदीघाट स्वच्छतेची मोहिम

“राम कृष्ण हरी... आपले गाव, आपले कर्तव्य” या घोषणेसह बलशाली भारत (शिवम्) सामाजिक संघटनातर्फे गावातील नदीघाटाची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

अलीकडील पावसामुळे नदीघाटावर मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण झाली होती. यामुळे गणेश विसर्जनासाठी येणाऱ्या गावकऱ्यांना तसेच भाविकांना अडचणींचा सामना करावा लागू नये, या उद्देशाने संघटनेने पुढाकार घेत स्वच्छता मोहीम राबवली.

दि. २ सप्टेंबर रोजी गावातील सर्वांचा लाडका गणपती बाप्पा विसर्जनासाठी जाणार असल्याने, घाट परिसर स्वच्छ आणि स्वच्छतामय राहावा, यासाठी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घाटावरील कचरा व गाळ साफ करून परिसर स्वच्छ केला.

या उपक्रमात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी स्वच्छतेपूर्वी व स्वच्छतेनंतरचे आनंददायी क्षण टिपून गावकऱ्यांना संदेश दिला की “आपले गाव आपले कर्तव्य” हे केवळ घोषवाक्य नसून, प्रत्येक नागरिकाने पाळायचे कर्तव्य आहे.

बलशाली भारत सामाजिक संघटनाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


गणपती विसर्जनापूर्वी नदीघाटाची स्वच्छता – बलशाली भारत सामाजिक संघटनेचा उपक्रम
Total Views: 45