बातम्या
स्वच्छतेचे नियम धाब्यावर! कोल्हापुरात महापालिकेचा दंडाचा दणका; ३२७ जणांवर कारवाई
By nisha patil - 11/26/2026 3:12:23 PM
Share This News:
स्वच्छतेचे नियम धाब्यावर! कोल्हापुरात महापालिकेचा दंडाचा दणका; ३२७ जणांवर कारवाई
कोल्हापूर शहरात अस्वच्छता पसरवणाऱ्या नागरिक आणि व्यावसायिकांविरोधात महापालिकेने आता कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. नोव्हेंबर महिन्यात अवघ्या २५ दिवसांत तब्बल ३२७ जणांना दंड ठोठावत ५ लाख ७३ हजार ७५० रुपयांची वसुली करण्यात आली आहे. सिंगल यूज प्लास्टिकचा वापर करणारे १०८ जण, तर सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणारे तब्बल १५५ जण कारवाईच्या कचाट्यात सापडले आहेत. धूम्रपान, थुंकणे, उघड्यावर लघुशंका करणे आणि रस्त्यावर खरमाती टाकणाऱ्यांनाही महापालिकेने सोडलेले नाही. आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या आदेशानुसार उपद्रव शोध पथकाची ही धडक मोहीम सुरू आहे. विशेष म्हणजे, केवळ दंड वसूल करून महापालिका थांबणार नसून नियम मोडणाऱ्यांवर गुन्हेही दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शहर अस्वच्छ करणाऱ्यांनो सावधान! स्वच्छतेचे नियम मोडाल तर खिशाला कात्री लागणार, हे मात्र निश्चित!
स्वच्छतेचे नियम धाब्यावर! कोल्हापुरात महापालिकेचा दंडाचा दणका; ३२७ जणांवर कारवाई
|