बातम्या
'बकरं कापायची जत्रा' बंद करून पुरणपोळीचा नैवेद्य — राणी कुंभार यांचा समाजप्रबोधनाचा स्तुत्य निर्णय!
By nisha patil - 4/16/2025 6:22:56 AM
Share This News:
'बकरं कापायची जत्रा' बंद करून पुरणपोळीचा नैवेद्य — राणी कुंभार यांचा समाजप्रबोधनाचा स्तुत्य निर्णय!
सातवे (ता. पन्हाळा) – गावातील पारंपरिक 'बकरं कापायची जत्रा' बंद करून, त्या जागी पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करून सौ. राणी रजनीकांत कुंभार (सध्या ठाणे, मुंबई) यांनी एक सामाजिक आणि अध्यात्मिक पाऊल उचलले आहे.
आळोबानाथ मंदिरात पारंपरिक रीत म्हणून चालत आलेली ही प्रथा अहिंसा आणि संत विचारांवर श्रद्धा ठेवत त्यांनी थांबवली. "देव कधीच कोणत्याही जीवाच्या बलिदानावर प्रसन्न होत नाही" असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला.
या निर्णयाला गावकऱ्यांनी आणि कुटुंबीयांनीही उभा पाठिंबा दिला.
यावेळी तळसंदे गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. शुभांगी कुंभार, डॉ. संतोष निकम, सतीश डुबल गुरुजी, सदाशिव कुंभार, रजनीकांत कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते.
सौ. राणी कुंभार यांनी आळोबानाथ चॅरिटेबल ट्रस्टला आर्थिक मदत करून सामाजिक उत्तरदायित्वही पार पाडले.
'बकरं कापायची जत्रा' बंद करून पुरणपोळीचा नैवेद्य — राणी कुंभार यांचा समाजप्रबोधनाचा स्तुत्य निर्णय!
|